यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कास्ट्राईब वन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा जळगावच्या वतीने कास्ट्राईब वन कर्मचारी मेळाव्याचे आयोजन उद्या रविवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता यावल वनविभाग सभा हॉलमध्ये करण्यात येणार आहे.
या वन कर्मचारी संघटनेच्या सभासद आढावा बैठकीत सुरुवातीला परिचय सत्र होईल. त्यानंतर राज्यस्तरीय संघटनेचे पदाधिकारी आणि प्रमुख वक्ते हे वन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतील. जळगाव जिल्हा कास्ट्राईब वन कर्मचारी कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड व चर्चा होऊन वन कर्मचारी यांच्या अडचणी आणि समस्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा कास्ट्राईब वन कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सुमित भुईगड, व्ही.जी.जाधव, मनोज कांबळे, अमोल वाघमारे, डी.एस.थोरात, विकास अवचार, प्रभाकर पारवे आणि अनिल सुरडकर यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पुलकेशी केदार, बापू साळुंखे, ब्रह्मानंद तायडे, साधना बाविस्कर, राजेंद्र राणे आणि योगेश अडकमोल यांचं सहकार्य लाभत असून विकास सोनवणे, रोहिणी थोरात, कमल ढेपले, युवराज मराठे, योगेश सोनवणे, प्रमिला मराठे, गोवर्धन डोंगरे, बाळाजी जोहरे, योगीराज तेली, सोनाली बारेला, अनिल पाटील, सविता वाघ, समीर तडवी, सचिन तडवी, राकेश निकुंभे, वैशाली गायकवाड, संभाजी सूर्यवंशी, हनुमान सोनवणे, खलील याकुब शेख, मीनाक्षी सोनवणे, संभाजी सूर्यवंशी, राजू बोडल, अजय महिरे, सुमित्रा पावरा, सुनील भोई, कृष्णा शेळके, नोकेश बारेला, कल्पना पाटील, सुपडू सपकाळे, मंदा मोरे, किरण गजरे, बाजीराव बारेला, नानसिंग बारेला, सरला भोंगरे, प्रकाश काळे, संदीप पावरा, योगीराज तेली आधी परिश्रम घेत आहेत.