एफबीआयच्या संचालकपदी भारतीय वंशीय कश्यप पटेल यांची निवड

न्युयॉर्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडो अमेरिकन कश्यप पटेल म्हणजेच काश पटेल यांची निवड पुढील एफबीआयचे संचालक म्हणून केली आहे. काश पटेल यांचा उल्लेख त्यांनी “अमेरिकन फस्ट फायटर” असा केला आहे. काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांपैकी एक आहे. जानेवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारीची सुरूवात होणार आहे. त्यांनी आता त्यांच्या ‘ट्रम्प सरकार’ मध्ये काश पटेल यांच्या द्वारा अजून एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश झालाअ आहे.

कश्यप/ काश पटेल हे 44 वर्षी भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. त्यांचे आई वडील भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. काश पटेल यांनी विधी आणि नॅशनल सिक्युरिटी मध्ये शिक्षण घेतले आहे. राज्यातल्या आणि फेडरल कोर्टात त्यांनी पब्लिक डिफेंडर,म्हणून कामाला सुरूवात केली. त्यांनी मर्डर पासून आर्थिक गुन्हे अशा विविध खटल्यांमध्ये वकीली केली आहे. काश पटेल यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये एका गुजराती स्थलांतरित कुटुंबात झाला जो 1980 मध्ये पूर्व आफ्रिकेतून क्वीन्स, न्यूयॉर्क येथे स्थलांतरित झाला. त्यांचे कुटुंब मूळचे भारतात गुजरात मधील वडोदरा येथील आहे. मात्र, दोन्ही आई-वडील युगांडामध्ये राहत होते.

Protected Content