नवी दिल्ली वृत्तसंस्था । कलम-३७० हटविल्यामुळे जम्मू-काश्मिरमधील जनतेला विकासाच्या संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ते स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिलेल्या संदेशात बोलत होते.
देशवासियांना संबोधित करतांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी जे नुकतेच बदल करण्यात आले. त्यामुळे इथल्या रहिवाशांना त्याचा मोठा लाभ होईल, असा मला विश्वास आहे. काश्मिरी जनतेलाही देशाच्या इतर भागातल्या नागरिकांना मिळणार्या सर्व अधिकार आणि सुविधांचा लाभ घेता येईल. समानतेला प्रोत्साहन देणारे प्रगतीशील कायदे आणि तरतुदींचा उपयोग त्यांना करता येईल. तसेच, शिक्षणाचा अधिकारफ कायदा लागू झाल्यानं जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सर्व बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळेल. माहितीचा अधिकार प्राप्त झाल्याने जनहिताशी संबंधित माहिती इथल्या लोकांना मिळू शकेल. पारंपरिक रुपाने वंचित राहिलेल्या वर्गासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आणि इतर सुविधा मिळू शकतील,फ असं राष्ट्रपती म्हणाले. तसेच तिहेरी तलाक सारख्या प्रथा नष्ट झाल्याने महिलांना न्याय मिळेल आणि भयमुक्त जीवन जगण्याची संधी त्यांना मिळणार असल्याचंही ते म्हणाले. तसेच तसेच तिहेरी तलाक सारखी अनिष्ठ प्रथा संपुष्टात आणल्याने आपल्या मुलींना खर्या अर्थाने न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादनदेखील राष्ट्रपतींनी केले.