मुंबई । सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या जीवनसाथी करूणा धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या प्रेमकथेवर पुस्तक लिहणार असल्याची घोषणा एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी पुस्तक लिहण्याची घोषणा केली आहे. माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे, अशी माहिती करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन देण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीने लैंगीक शोषणाचे आरोप केल्याने खळबळ उडाली होती. यानंतर मुंडे यांनी पोस्ट लिहून आपले त्या तरूणीच्या बहिणीसोबत संबंध असल्याचे मान्य केले होते. यानंतर संबंधीत तरूणीने आपले आरोप मागे घेतले होते. तर नंतर खुद्द धनंजय मुंडे यांची साथीदार करूणा मुंडे यांनी आपल्या मुलांना भेटू दिले जात नसल्याची तक्रार केली होती. यानंतर आता त्यांनी थेट पुस्तक लिहण्याची घोषणा केली असून यात नेमके काय असेल ? याबाबत आता उत्सुकता लागली आहे.