जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रावर विशेष भर देण्यात येणार असून राज्यातील कृषी विद्यापीठांसह कोरोना पंचसूत्री बजेट तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2022- 23 चा अर्थसंकल्प मांडताना केले.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, संशोधनासाठी कृषी विकास निधी देण्यात येणार आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कर रचने द्वारा मिळणाऱ्या उत्पन्नातून बाजार समिती कर्जफेडहंगामात पूर्ण झालेले असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी पतसंस्थांचे कोअर बँकिंग सक्षमीकरण
करण्यावर राज्य शासनाचा भर असून 207 सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत या प्रकल्पातून सतरा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. ओळख प्रकल्प संशोधन हवेली येथील संभाजी महाराज स्मारकासाठी निधी कृषी पंपांना वीजपुरवठा एमआरजीएस अंतर्गत 42 हजार 902 सिंचन विहिरी कृषी क्षेत्रात केळी द्राक्ष फळबाग यांचा देखील फलोत्पादन क्षेत्रात समावेश करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषण करताना सांगितले.
अंगणवाडी, बालवाडी सेविकांना मोबाईल सुविधा
अंगणवाडी सेविका ना मोबाईल सुविधा देण्यात येणार असून महिला बालविकास प्रकल्प विभागासाठी तरतूद असल्याचेही म्हटले आहे.
आरोग्य विभागाला विशेष अनुदान
राज्यातील रुग्णालयात खाटांची संख्या वाढविणार, टाटा कॅन्सर संस्थेला रायगड येथे जागा उपलब्ध करून देणार, पशुवैद्यकीय महाविद्यालय देखील निधी, जिल्हा नियोजन अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पाच टक्के निधी मिळणार, वैद्यकीय शिक्षण विभागासाठी भरीव तरतूद, वैद्यकीयशिक्षण संस्था इनोव्हेशन हबसाठी निधी महिलांना कौशल्य विकास रोजगार योजनेअंतर्गत निधी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.