यावल, प्रतिनिधी । सततच्या नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीमुळे तालुक्यातील थोरगव्हाण येथील तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली. याबाबत गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहीवाशी सुभाष रामदास पाटील (वय 40) यांनी त्याची शेतामध्ये काहीतरी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शेतीमध्ये नापिकी त्यामुळे वारंवार त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही आधी केलेला आहे. शेवटी वाढलेल्या कर्जाचे ओझे व शेतीत उत्पन्न येत नसल्यामुळे अखेर 2 सप्टेंबर रोजी विष प्राशन करून जीवन यात्रा संपवली. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.