कन्नड घाटाच्या खोल दरीत ट्रक कोसळून चालक जागीच ठार

चाळीसगाव,  प्रतिनिधी । परचून व प्लायवूड भरलेला ट्रक हैद्राबादकडे जात असताना कन्नड घाटातील वळणावर अचानक वाहन समोरून अंगावर आल्याने ट्रक  खोल दरीत कोसळून चालकाचे जागीच दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, परचून व प्लायवूड भरलेला ट्रक (क्र. केले.५६-५०४३) अहमदाबाद-गुजरात येथून हैद्राबादकडे जात असताना कन्नड घाटातील लहान मंदिराच्या पुढील वळणावर भरधाव वाहन अचानक अंगावर आल्याने ट्रकवरील ताबा सुटून ट्रक खोल दरीत कोसळून रेवन सिध्दा नागप्पा (वय-२५ रा. मुस्तरी कर्नाटक) या चालकाचे जागीच मृत्यू झाले. या अपघातात क्लिनर अमजद एम. डी‌. हनिफमिया (वय-२६ रा. मुस्तरी कर्नाटक) सुदैवाने बचावला आहे. क्लिनरला डोक्याला तसेच हातापायाला दुखापत झाली आहे.हि थरारक घटना शुक्रवार, ७ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिसात शनिवार रोजी दुपारी १, वाजेच्या सुमारास अमजद हनिफमिया यांच्या सांगण्यावरून भादवी कलम- ३०४(अ), २७९, ४२७ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दिलीप रोकडे हे करीत आहेत.

Protected Content