जळगाव (प्रतिनिधी) आपल्या देशात विविध जाती-धर्मांचा अनोखा संगम बघायला मिळतो. अशाच वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या सामाजिक संघटनांच्या कार्याची ओळख करून देण्याचा विडा ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने उचलला आहे. याच मालिकेत आता ‘कंजारभाट समाज युवा फौंडेशन’ या संघटनेच्या कार्याची माहिती आपणास करून देत आहोत.
मुळात राजस्थानातून स्थलांतरित झालेला हा समाज आज महाराष्ट्रात मद्यार्क निर्मितीसाठी कुप्रसिद्ध ठरला आहे. मात्र या समाजातील सुशिक्षित तरुण पिढी आपल्या समाजाच्या या ओळखीने अस्वस्थ आहे. २१ व्या शतकाच्या आधुनिक वातावरणात लवकरात लवकर जुनी ओळख पुसून नवी सुसंस्कृतपणाची ओळख निर्माण करण्याची धडपड आणि तळमळ या पिढीत दिसून यात आहे. त्याच बरोबर इतर समाजातील घटकांनी आपणास समजून घ्यावे व सरकारनेही समाजाला मदतीचा हात देवून मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे एवढीच माफक अपेक्षा हे युवा पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. आमच्या प्रतिनिधीने युवा फौंडेशनचे पदाधिकारी नरेश बागडे, विजय अभंगे व राहुल नेतलेकर यांच्याशी केलेली ही बातचीत…