जळगाव प्रतिनिधी । सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र राज्याच्या पोलीसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध जळगाव शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तिचे प्रतिकात्मक पोस्ट फाडून आंदोलन करण्यात आले.

सिने अभिनेत्री कंगना रानावत हिने महाराष्ट्र व महाराष्ट्र पोलीसांबद्दल अपशब्द होते. राज्यात कंगनाच्या विरोधात संतापाची लाट तयार झाली आहे. आज जळगाव शहरात दुपारी १२ वाजता शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली कंगना रानावत हिचे फोटो असलेले पोस्टर फाडून निषेध करण्या आला. यावेळी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3375937019298902/