भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथील रहिवासी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका अनिता मगर यांना नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार-2019 दिल्ली येथे मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका अनिता दिपक मगर यांना भारतीय दलीत साहित्या अकादमी नवी दिल्लीच्या वतीने देण्यात येणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2019 पुरस्कारने अकादमीचे अध्यक्ष डॉ. सुमनाक्षर सोनपाल यांच्याहस्ते नुकताच देण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन आरोग्य सेविकाची नौकरी मिळविली. मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी आतापर्यंत हजोरो रुग्णांची सेवा केली आहे. ईश्वराच्या आशीर्वादाने मला आरोग्य सेविकेची नोकरी मिळाली आहे. ईश्वराच्या कृपेने मी रुग्णांची सेवा करीत असल्याचे अनिता मगर यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत अनिता मगर यांना आदर्श आरोग्य परिचारिका, विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फिलोशिप अवार्ड, तालुकास्तरीय अवार्ड असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व सामाजिक क्षेत्रातील सहभाग बद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याने प्रोत्साहन वाढत असून माझ्या हातून रुग्णांची चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करेल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.