वॉशिग्टन-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची उमेदवारी सोडल्यानंतर पाच दिवसांनी, कमला हॅरिस यांनी शुक्रवारी अधिकृतपणे डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. त्यांनी पोस्ट करून लिहिले, ‘मी अध्यक्षपदासाठी फॉर्मवर सही केली आहे. प्रत्येक मत मिळवण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन आणि यावर्षी नोव्हेंबरमध्ये आमचा पक्ष विजयी होईल.
याआधी २१ जुलै रोजी रविवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. देश आणि पक्षाच्या हितासाठी मी निवडणूक सोडत असल्याचे ते म्हणाले होते. बायडेन यांनी अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले होते. यानंतर २६ जुलै रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनीही भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. दोघांनी फोन करून कमला हॅरिस यांना याबाबत माहिती दिली.