अमळनेर (प्रतिनिधी) येथील कल्याणी पुंडलिक या विद्यार्थिनीने कंपनी सेक्रेटरी (कंपनी सचिव) अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षेत देशात पहिली येण्याचा मान मिळवला आहे. ती ‘बीएमसीसी’ची विद्यार्थिनी आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत यंदा मुलींनींच वर्चस्व गाजवलेलं आहे.
दी कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे गेल्या डिसेंबर महिण्यात घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ही परीक्षा देशभरातील १२८ केंद्रांवर आणि दुबईत २९ व ३० डिसेंबरला घेण्यात आली होती. राष्ट्रीय पातळीवरील निकालात संस्थेने पहिल्या २५ क्रमांकांची यादी जाहीर केली. परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६२.११ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले. सदर त्या परीक्षेत पुण्याच्या अकॅडमीची विद्यार्थिनी कल्याणी पुंडलिक देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
या घवघवीत यशाचे श्रेय ACE अकॅडमीचे प्रसाद भट,अतुल करमपुरवाला, व कौस्तुभ अत्रे,तसेच त्यांचे आई-वडील यांना जाते. या ऍकॅडमीची विद्यार्थ्यांनी अक्षता देसाई सातवा क्रमांक, सुष्मिता त्र्यंबक तेरावा क्रमांक, ऋषिकेश तळवळकर एकोणवीस वा क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी सुद्धा घवघवीत यश संपादन केले आहे. अकॅडमीचे संचालक अतुल करमपुरवाला हे मूळचे अमळनेरचे असून त्यांच्या ACE ॲकॅडमीतील या वर्षीही चार विद्यार्थिनी यश संपादन केले आहे. त्यांचे सर्व सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. दरम्यान, या परीक्षेचा सविस्तर निकाल www.icsi.edu या वेबसाइटवर उपलब्ध आहे.