यावल प्रतिनिधी । येथील स्वामीनारायण मंदिराजवळील रहिवासी कल्याणी प्रभाकर महाले हिची पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी विशेष मागास प्रवर्गात राज्यातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक गट-ब च्या ६५० जागांसाठी पूर्व, मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी व मुलाखत घेण्यात आलेली होती. या सर्व प्रक्रियांमधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल पी.एस.आय. परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. तिला ३४० पैकी १९४ गुण मिळाले.
१९७ मुलींमधून ती द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणी महाले हिस आज ही आगळी वेगळी भेट मिळाली आहे. यानंतर तिचे मेडिकल होऊन नंतर प्रशिक्षण होईल. येथील एसटी आगारातील निवृत्त वाहतूक नियंत्रक पांडुरंग महाले यांची ती नात होय. तर वाहक प्रभाकर महाले यांची कन्या होय. तिच्या या निवडीबद्दल शहरात सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.