जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी कल्पनाताई पाटील यांची निवड करण्यात आली असून याबाबत आज पक्षाच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
अजितदादा पवार गटाच्या वतीने दोन्ही जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असली तरी अद्यापही महिला जिल्हाध्यक्ष पद खाली होते. या अनुषंगाने आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कल्पनाताई पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे याबाबत आज पक्षाच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
कल्पनाताई पाटील यांनी आधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध पदांवर काम केलेले आहे. त्या ग्रंथालय सेलच्या प्रदेश कार्यकारणीवर देखील होत्या. त्यांचे पुत्र अभिषेक पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली असून त्यांनी जळगाव मधून गेल्या वेळेस विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. या पार्श्वभूमीवर आज कल्पनाताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून याबद्दल त्यांचे राजकीय वर्तुळातून कौतुक होत आहे.