पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री. संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात माजी मंत्री स्व. के. एम. (बापु) पाटील यांना २३ व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अनिल कृष्णराव पाटील, रवींद्र कृष्णराव पाटील, जयदेव पाटील, शरद पाटील, दिनकर पाटील, सुभाष रामजी पाटील, बापूराव विठ्ठल पाटील, भागवत पाटील, योगेश पाटील, भूषण बोरसे, सचिन देवरे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते स्व. के. एम. (बापु) पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी अनिल पाटील यांनी स्व. के. एम. पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा सादर केला. जयदेव पाटील यांनीसुद्धा मनोगत व्यक्त करतांना स्व. के. एम. पाटील यांनी केलेल्या जलसंधारणाच्या संदर्भातली तसेच रोजगार आणि कष्टकऱ्यांच्या हाताला काम मिळावा, यासाठी जळगाव जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तर शरद पाटील यांनी स्व. के. एम. पाटील यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकत सर्व आठवणी उपस्थितां सोबत शेअर केल्या.
संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेच्या वतीने आणि स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयाच्या वतीने स्व. के. एम. (बापु) पाटील यांना आदरांजली अर्पण करतांना सर्व विशेष विद्यार्थी व उपस्थितांनी दोन वेळेस गायत्री मंत्राचे उच्चारण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शिक्षकांनी केले.