जामनेर प्रतिनिधी । काश्मीर संदर्भातील कलम ३७० व ३५ (अ) हटविल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करीत येथील नगर परिषदे समोरील संभाजी महाराज चौकात फटाके वाजवून ढोलताशांच्या गजरात भाजपा कार्यकर्त्यांनी निर्णयाचे स्वागत केले.
याबाबत माहिती अशी की, कार्यकर्त्यांनी भारताचा तिरंगा ध्वज चौकात मिरविण्यात आला. तसेच यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन, भाजपा तालूकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, जा.ता.ए. सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, आतिष झाल्टे, प्रमोद वाघ, सुहास पाटील, विलास पाटील, गोपाल राजपूत आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. यावेळी कार्यकर्त्यांनी भारताचा तिरंगा ध्वज चौकात मिरवला.