वाणेगाव-निंभोरा विकासो चेअरमनपदी कैलास पाटील

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वाणेगाव – निंभोरी विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी येथील कैलास पाटील तर व्हाईस चेअरमनपदी उषाबाई पाटील यांचे एकमेव अर्ज आल्याने या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संचालक रमेश पाटील, भगवान पाटील, सुधीर देवरे, दिगांबर राऊतराय, नरेंद्र पाटील, अभिमन सोनवणे, रामजी राठोड, नंदू पाटील, चंदू पाटील, विश्वास पाटील, रामजी राठोड, निर्मला धुमाळ उपस्थित होते. चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणुकीसाठी त्रंबक हावळे, प्रकाश देवरे, पतिंगराव पाटील, पृशोत्तम पाटील, भगवान पाटील यांनी सहकार्य केले. निवडणूक अधिकारी म्हणून एस. बी. शिंदे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव प्रताप सोनार यांनी काम पाहिले.

Protected Content