यावल (प्रतिनिधी) येथील एसटी महामंडळात बस आगारातील विविध पदावर कार्यरत असलेले पाच कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. पाचही कर्मचाऱ्यांना नुकताच यावल आगाराच्या वतीने सन्मानपुर्वक निरोप देण्यात आला.
यावल एस.टी. आगाराच्या सभागृहात दिनांक २ जुन रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाला. या सेवानिवृत्तीपर| निरोप संमारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल एस.टी. आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा इंटकचे सचिव नरेन्द्रसिंग राजपुत व भगतसिंग देवनाथ पाटील, यावलचे पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी यांच्यासह यावल आगारातील सहाय्यक वाहनुक अधिक्षक जी.पी. जंजाळ, आगाराचे सहाय्यक निरीक्षक के.बी तडवी, आगाराचे वरीष्ठ वाहतुक लिपीक जे.एम. कुरमभट्टी यांच्यासह आगारातील सर्व कर्मचारी वृंद्घ मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपास्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सेवानिवृतपर निरोप कार्यक्रमात जे.पी. पाटील वाहतुक नियंत्रक सेवा ३५ वर्ष, रवीन्द्र पी. चौधरी वाहक २९ वर्ष सेवा, पी.एन. बडगुजर वाहतुक नियंत्रक ३५ वर्ष सेवा, वाहक डी.एन. बाविस्कर २८ वर्ष सेवा आणी जि.एन. तायडे चालक २५ वर्षाच्या आपल्या सेवाकार्यातून सेवानिवृत झाले. त्यांचे गुणगौरव व सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी सर्व कर्मचारी आपल्या कुंटुबासह या कार्यक्रमास उपस्थित होते.