वाराणसी (वृत्तसंस्था) सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. त्यामुळे देशातील जवानांचा आत्मविश्वास कमी झालाय. म्हणूनच देशाच्या नकली चौकीदाराला हटविण्यासाठी मी वाराणसीतून निवडणूक लढवत असल्याचे, बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांनी म्हटले आहे. तेज बहाद्दूर यांना सैन्य दलातील दर्जाहीन जेवणावर आवाज उठवल्याने बडतर्फ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकला आहे.
हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्याच काम तेज बहादूर यांनी केलंय. देशाच्या काना-कोपऱ्यातून मला पाठींबा देण्यासाठी जवान येत आहेत. आता, संसदेतही देशाचे जवान जायलाच हवेत, असे म्हणत तेज बहादूर यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. तर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या राष्ट्रांमध्ये किंवा विदेशात मोदींची भीती असते, मोदींचा दरारा असता, तर पुलवामाचा हल्ला झालाच नसता. मोदींचा धाक बसला असता, तर पुलवामा हल्ला झालाच नसता, असे तेज बहाद्दूर यांनी म्हटले आहे.