Home क्राईम जूना खेडी परिसरातून घरासमोरून दुचाकी लांबविली

जूना खेडी परिसरातून घरासमोरून दुचाकी लांबविली

0
30
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जूना खेडी येथे अंगणात लावलेली ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेमीचंद लालचंद शर्मा (वय-५२, रा. दत्तनगर डी.एन. कॉलेज मागे, जुना खेडी, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. फर्निचरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजता दरम्यान त्यांची मालकीची (एमएच १९ डीएल ७९५१) क्रमांकाची दुचाकी त्यांनी पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोधाशोध केली परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. यासंदर्भात नेमीचंद शर्मा यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार २ मार्च रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इंदल जाधव करीत आहे.


Protected Content

Play sound