मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची जामीनावर सुटका होताच ठाकरे गटाचा मुक्ताईनगरमध्ये जल्लोष करण्यात आला आहे.
सविस्तर माहितीअसे की, पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात (ईडी) ने यावर्षी जुलैमध्ये अटक केली होती. यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांचा जमीन अर्ज अनेक वेळा फेटाळला होता. परंतु आज दिनांक 9 /11 /2022 रोजी जामीन जवळपास एक महिने दोन दिवसानंतर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्याची बातमी प्रसिद्धी होताच मुक्ताईनगर तालुक्यातील उद्धव ठाकरे सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात फटाके फोडत जल्लोष केला.
याप्रसंगी युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, सचिन हीरोळे, गोपाल पाटील, सुमित हिरोळे, ओम माळी, राजू जाधव, दर्शन ठाकूर, मुन्ना बोदडे, अशोक जाधव, विशाल भोई, सौरभ हिरोडे, ईश्वर मस्के, तुषार सलावत, कुंदन पाटील यांच्यासह आधी शिवसैनिक उपस्थित होते.