माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे पाचोरा तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील डॉ. दिनेश सोनार यांच्या पुनगाव रोडवरील निवासस्थानी माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजाराम सोनार होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्याचा परिचय ज्येष्ठ पत्रकार शांताराम चौधरी यांनी उपस्थितांना करून दिला. सर्व पत्रकारांचा सन्मान शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजाराम सोनार यांनी माऊली संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला आणि पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले.

व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष युवराज महाजन, सचिव के. एस. महाजन, सहसचिव शांताराम चौधरी, संचालक एम. एस. महाजन, छगन पाटील आणि एम. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकार विनायक दिवटे, किशोर रायसाकडा, शांताराम चौधरी, अनिल येवले, राहुल महाजन, नंदू शेलकर, प्रवीण बोरसे, राजेंद्र खैरनार, श्रीकृष्ण चौधरी, प्रकाश विसपुते, आणि इतर अनेक पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन के. एस. महाजन यांनी पार पाडले. उपस्थितांचे आभार एम. एस. महाजन यांनी मानले.

Protected Content