यावल तालुक्यातील पत्रकारांचा नितीन सोनार मित्र परिवारातर्फे सन्मान

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठी पत्रकार दिनानिमित्त नुकतेच नितीन सोनार मित्र परिवाराने आयोजित कार्यक्रमात यावल तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पाटील फर्म हाऊसच्या नियोजित लॉन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डी. बी. पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यावेळी यावलचे पत्रकार अय्युब पटेल यांच्या पत्नी नसीमबी पटेल आणि वसाकळी येथील पत्रकार किरण माळी यांच्या अकाली निधनाबद्दलही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सन्मान आणि मान्यवरांचे मनोगत:
कार्यक्रमात तालुक्यातील पत्रकारांचा नितीन सोनार मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये पी. एस. सोनवणे सर, भगतसिंग पाटील, सुधीर चौधरी, शेखर पटेल, आणि पत्रकार डी. बी. पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आयोजन आणि उपस्थिती:
कार्यक्रमाचे आयोजन नितीन सोनार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. यामध्ये नितीन सोनार, अनिल पाटील इंजिनिअर, प्रशांत कासार, अशोक पाटील, मनोज सुतार, अतुल बडगुजर, राज काठोके, पिंटू मंदवाडे, किशोर कपले, राम सोनवणे, दिलीप जाधव, संजू सोनार, पी. एस. सोनवणे आदींचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चेतन अढळ यांनी केले. सन्मानित पत्रकारांमध्ये डी. बी. पाटील, अय्युब पटेल, शेखर पटेल, सुनिल गावडे, सुधीर चौधरी, बाळासाहेब आढाळे, तेजस यावलकर, प्रकाश चौधरी, जीवन चौधरी, ए. टी. चौधरी, शब्बीर खान, रणजित भालेराव, भरत कोळी, ज्ञानदेव मराठे यांचा समावेश होता.

Protected Content