यावल येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा (व्हिडीओ)

yaval press day

y

यावल, प्रतिनिधी | येथे आज (दि.६) या पत्रकार दिनानिमित्त विविध वृत्तपत्रांच्या तालुका प्रतिनिधींच्या सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री छत्रपती शिवाजी फाऊंडेशन यांच्या वतीने व सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठया उत्साहात पार पडला. या प्रसंगी अॅड. देवकांत पाटील यांच्या ‘दिशा’ या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रमही करण्यात आला.

 

येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर- यावल विधान सभेचे आमदार शिरीष चौधरी हे होते. त्यांच्याहस्ते येथील पत्रकार तालुका प्रतिनिधी यांचा तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १०.०० वाजता सत्कार करण्यात आला. समाज प्रबोधनात महत्वाची भूमिका बजावणारे, समाज व्यवस्थेचा महत्वाचा आधारस्तंभ असणारे, आपल्या निर्भिड आणि पारदर्शक लेखणीच्या सामर्थ्यावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य विषयक, शैक्षणिक, प्रशासकीय आदी क्षेत्रातील कामांना प्रोत्साहन आणि कमतरतेवर बोट ठेवत समाजात एक चांगला पायंडा घालून देणारे म्हणजेच समाज व्यवस्था घडविण्यासाठी योगदान देण्याचे कार्य हे पत्रकाराच्या लेखणीतुन होत असते असे आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार चौधरी आणि माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी पत्रकारांचा डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. देवकांत पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनतर्फे उपस्थित मान्यवर माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, प.स. गटनेते शेखर पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, जेष्ठ नेते गिरीधर पाटील, नितीन व्यकंट चौधरी, सीताराम पाटील, पोलिस निरिक्षक अरूण धनवडे, राष्ट्रवादीचे चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, नाना बोदवडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेंगडे, शहर अध्यक्ष बाळू फेंगडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, शिवसेनेचे सागर देवांग, चद्रकांत येवले, हेमंत येवले, नायब तहसीलदार आर.ए. माळी अॅड. भरत चौधरी, बाजीराव पाटील, यावल तालुका मराठा सेवासंघाचे अध्यक्ष अजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनिदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार डी.बी. पाटील, सुरेश पाटील, अरुण पाटील, राजेश कवडीवाले, अय्युब जी.पटेल, शेखर पटेल, तेजस यावलकर, प्रमोद वाणी, भरत कोळी, सुनील गावंडे, शेख काबीज, पराग सराफ यांचा सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, मराठा सेवा संघ सचिव संतोष पाटील. अॅड. भरत चौधरी, भूषण नागरे, गोलू माळी, नरेन्द्र शिंदे, राजू करांडे, दीपक पाटील, प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकार्यानी परिश्रम घेतले. कर्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक अजय पाटील यांनी केले तर देवकांत पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

 

 

Protected Content