वरणगांव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगांव येथे विविध राजकीय पक्ष व शासकीय कार्यालयातर्फे पत्रकार दिना निमित्त पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. वरणगांव नगर परिषद सभागृहात सत्कार प्रसंगी मुख्याधिकारी सचिन राऊत,रशीद नौरंगाबादी, राजुसिंग चव्हाण, दिपक काळे,नमन गुजरे, ज्ञानेश्वर पवार,संजय माळी,गणेश कोळी,रविकांत नारखेडे,राजू गायकवाड, गंभीर कोळी, राजू सोनार,संतोष वानखेडे, देविदास भोई, मुख्तार खान,निलेश झांबरे,प्रशांत माळी आणि इतर नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
वरणगाव पोलिस स्टेशन मुक्ताईनगरचे पोलिस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे , सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव, पीएस आय शेख इसमाईल, गांगुर्डे, सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे , श्रावण जवरे आदी उपस्थित होते. वरणगांव येथे शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांनी स्वामी समर्थ मंदीर येथे पत्रकारांचा सत्कार केला आहे. या प्रसंगी निलेश सुरळकर,प्रशांत पाटील , संतोष माळी, दुर्गेश बेदरकर, राहुल बावणे,कमलेश येवले, अनिकेत चव्हाण आदी उपस्थित होते.
भाजपातर्फे माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी पत्रकारांचा सत्कार केला यावेळी मिलिंद भैसे , नामदेव सोनवणे , अजमल खान, फजल शेख उपस्थीत होते. काँग्रेस शरद पवार गटातर्फे वाय आर पाटील, दिपक मराठे, रवि पाटील, शांताराम सुरडकर ‘ रितेश समाधान चौधरी , कैलाश माळी आदींनी पत्रकारांचा सत्कार केला. अशफाक काझी वरणगाव शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी,मनोज अग्रवाल आदींनी पत्रकारांचा सत्कार केला आहे . वरणगांव येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश महाले , जेष्ठ पत्रकार मनोहर लोणे, बाळा साहेब चव्हाण , विजय वाघ व सुनिल वानखेडे यांनी या प्रसंगी पत्रकारांच्या समस्या विषयी मनोगत व्यक्त केले . यावेळी पत्रकार दत्तात्रय गुरव ,विनोद सुरवाडे, राजू खडसे , किरण कोलते, रवी गायकवाड आदी उपस्थित होते.