Home धर्म-समाज पत्रकार अय्युब पटेल यांना मातृशोक !

पत्रकार अय्युब पटेल यांना मातृशोक !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील आयशा नगर भागातील रहिवासी आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व बिबाबी गफुर पटेल (वय ८९) यांचे आज, शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

बिबाबी पटेल या ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’चे यावल प्रतिनिधी अय्युब पटेल यांच्या मातोश्री होत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. बिबाबी गफुर पटेल यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५:३० वाजता त्यांच्या आयशा नगर येथील राहत्या घरापासून निघणार असून, त्यानंतर स्थानिक कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


Protected Content

Play sound