अमळनेर प्रतिनिधी । येथे तालुका पत्रकार संघातर्फे शहरातील नांदेडकर सभागृहात पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष रमेश पवार शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत होते कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश काटे यांनी केले. याप्रसंगी भुजबळ म्हणाले की, उत्तम पत्रकार होण्यासाठी कोणतेही बाबीसंबंधी ज्ञान व कौशल्य आवश्यक आहे. पत्रकारिता व्यवसाय म्हणून स्वीकारताना या योजनेतून मिळणारे आर्थिक व सामाजिक फायदे प्रथम विचारात घेतले जातात हे तर उघडच आहे आज या व्यवसायात उत्तम पगार प्रसिद्धी सामाजिक प्रतिष्ठा अनेक सोयी-सुविधा परदेश प्रवासाच्या संधी या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध आहेत पण सर्व पत्रकारांचे वैयक्तिक फायदे झाले पत्रकारिता व्यवसाय म्हणून स्वीकारताना पत्रकारितेची समाज हितासाठी समाजाच्या उन्नतीसाठी कसा उपयोग करता येईल याचाही विचार करणे अपेक्षित असते. स्वतंत्र पूर्व काळातील पत्रकारिता एका विशिष्ट देण्यासाठी असायची पण स्वतंत्र मिळाल्यानंतर पत्रकारितेवर लोकांचा विश्वास राहिला नाही म्हणून आपण प्रत्रकारिता करताना तेवढेच जे सत्य आहे ते देण्याचा प्रयत्न करावा. पत्रकारांनी संघटन वाढवणे गरजेचे आहे. पत्रकारिता हा एक व्यवसाय नसून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं पवित्र कार्य असल्याचे भुजबळ म्हणाले.
यावेळी पत्रकारांना दैनंदिन जीवनात निर्माण होणार्या समस्या या संदर्भामध्ये ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, जगन्नाथ बडगुजर, मरसाळे जितेंद्र ठाकूर यांनी प्रश्न विचारले. याप्रसंगी पत्रकारांच्या समस्यांचं निरसन देवेंद्र भुजबळ यांनी केले.