पारोळा प्रतिनिधी | पालिकेत काम करत असताना भगवान चौधरी यांचे निधन झाले. मुलांना उच्चशिक्षित करून नोकरी मिळावी या आशेने ते काम करीत होते. मात्र काळाने घात घातल्याने त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. मात्र गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागत भगवान चौधरी यांच्या जागेवर सतीश पाटील यांना नोकरी लागली आहे. नगराध्यक्षांनी विवाहाच्या प्रसंगीचं नोकरीची जॉईन लेटर दिल्यामुळे कुटुंबियांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेत भगवान चौधरी सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. कालांतराने त्यांचे दुःखद निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने चौधरी कुटुंबावर काळाचा घात झाला. वडिलांबरोबर आईचे देखील निधन झाल्याने सतीश चौधरी एकटे पडले. वडिलांच्या जागेवर नोकरी मिळावी त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करावे या भावनेतून सतीश यांनी आपली समस्या नगराध्यक्ष करण पाटील यांच्याकडे मांडली. याची दखल घेत शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना विवाह भेटीतच नोकरीचे जॉईन लेटर दिले. यासाठी मुख्याधिकारी ज्योती पाटील, कार्यालयीन अधिक्षक संगमित्रा संदानशिव, लिपिक लांबोळे कर्मचार्यांनीही पाठपुरावा केला होता.
विवाहच्या प्रसंगी नगराध्यक्ष पाटील यांनी नोकरीचे जॉईन लेटर देऊन नातेवाईकांना सुखद धक्का दिला. सतीश यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याने नगराध्यक्ष पाटील यांचे चौधरी कुटुंबीयांनी व नातलगांनी आभार मानले.