जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातुन कार्यरत असणाऱ्या “पीपल्स पीस फॉउंडेशन” या संस्थेच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने,दि. ४ व ५ मे २०१९ या कालावधीत, हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी आयोजित “जॉब फेअर फेस्टिवल २०१९” अर्थात रोजगार मेळाव्याला सकाळी १० वा. उत्साहात प्रारंभ झाला.
जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, सोयो सिस्टमचे किशोर ढाके , एस. के . ट्रान्सलाईनचे हेमंत कोठारी, बियाणी ग्रुप चे मनोज बियाणी, संगीता बियाणी, दारा अड्वाइजर्सचे पंकज दारा, सुरेश हसवानी, व्ही .पी. कन्स्ट्रक्शनचे वर्धमान भंडारी, प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे, रॉयल फर्निचरचे आनंद गांधी, नवजीवन कलेक्शनचे अभय कांकरिया, धवल टेकवानी आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
दोन दिवस चालणार जॉब फेअर
सामाजिक कार्यकर्ते कांताई बंधाऱ्याचे प्रवर्तक शिवाजी भोईटे यांनी पीपल्स पीस फाऊंडेशनचे तथा जॉब फेअर फ़ेस्टिवलचे मार्गदर्शक लोहित मतानी यांचा पुष्पगुच्छ देऊन उत्स्फुर्त सत्कार केला. दोन दिवस चालणाऱ्या या जॉब फेअर फ़ेस्टिवलमध्ये नोंदणी केलेल्या अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली. उद्घाटनानंतर लगेचच निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. ऐनवेळी आलेल्या उमेदवारांचीही नोंदणी करून घेत त्यांनाही संधी देण्यात येत होती. अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी सामाजिक जाणीवेतुन या संपूर्ण मेळाव्यावर वेळोवेळी लक्ष ठेवत मार्गदर्शन करीत होते. या मेळाव्या प्रसंगी अॅड. राजेंद्र वंजारी, अमर कुकरेजा, सतीश मतानी, शंकर तलरेजा, नरेश कावना, ओमप्रकाश सचदेव, प्रीतम मतानी, रेश्मा बहराना, रिटा भल्ला, हर्षा केसवानी, सुनील पाटील, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे अधिकारी एम. बी. देशपांडे, सुरेश पाटील, अरुण ठाकरे, यांची विशेष उपस्थिती होती.
फेस्टिवलमध्ये सहभागी कंपन्या
या रोजगार मेळाव्यात सोयो सिस्टीम, एस. के. ट्रान्सलाईन,बियाणी ग्रुप,व्ही. पी. भंडारी, आर. जी. एन्टरप्राइसेस, सातपुडा ऑटो मोबाईल्स, नवरंग टी, अमर डेअरी, सरस्वती फोर्ड, लक्ष्मी ग्रुप, प्रचिती मीडिया, पी. एन. बी. इ . उद्योग समूह सहभागी झालेले आहेत. या मेळाव्यास प्रचिती मीडियाचे सचिन घुगे व त्यांचे सहकारी निलेश वाघ, अक्षय लोडते, प्रदीप पाटील, हेतल नेमाडे, राम बोरसे हे सुद्धा सहकार्याच्या दृष्टीने उपस्थित होते. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनी आयोजकांचे आभार मानले आहेत. तसेच या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.