पीपल्स पीस फाऊंडेशनतर्फे जळगावात रोजगार मेळावा ( व्हिडीओ )


जळगाव प्रतिनिधी । येथील पीपल्स पीस फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे जळगावात रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा मनजीत कौर मतानी यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिली.

मनजीत कौर मतानी या गत सात वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गुन्हेगारी, बेरोजगारी, देहविक्री व्यवसाय करणार्‍या महिला, एलजीबीटी समुदाय आदींशी संबंधीत समस्यांचे निराकरण करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. या समुदायातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याला त्यांनी कायम प्राधान्य दिले आहे. दरम्यान, जळगावातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी पीपल्स पीस फाऊंडेशनच्या माध्यमातून जळगावात ४ आणि ५ मे रोजी शहरात हॉटेल रॉयल पॅलेस मध्ये भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात जळगाव शहर आणि औद्योगिक वसाहतीमधील सुमारे पाचशेपेक्षा जास्त जागांची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त करण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारणी करण्यात येणार नसल्याची माहिती मनजीत कौर मतानी यांनी दिली.

जळगावात होणार्‍या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्यात आलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी कॉल पाठविण्यात येणार असल्याची माहिती सौ. मतानी यांनी याप्रसंगी दिली. या मेळाव्यात सोयो सिस्टिम्स, एस.के. ट्रान्सलाईन्स, रॉयल फर्निचर, मिम्स , बियानी गृप , व्ही. पी . भंडारी, आर.जी एन्टरप्रायजेस, दारा अँडव्हायजरी सर्व्हिसेस, प्रचिती मिडिया इ अनेक कंपन्यांचा सहभाग असणार आहे . जॉब फेअर फेस्टिवल२०१९ या रोजगार मेळाव्याद्वारे दहावी , बारावी , आय.टी.आई , डिप्लोमा , इंजिनिअरिंग , बी कॉम , एम.बी.ए. , एम.सी.ए, इ . विविध पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना व बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपब्लध होणार आहे .

लिंक : रोजगार मेळाव्यात नोंदणी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

https://peoplespeacefoundation.com/job-fair

व्हिडीओ : पहा मनजीत कौर मतानी नेमक्या काय म्हणाल्यात ते !

Add Comment

Protected Content