मुंबई (वृत्तसंस्था) निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चिंताजनक आहे. जामिया असो किंवा जेएनयू…विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जाऊ नये… त्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे, अशा आशयाचे ट्विट राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
दिल्लीतील जवाहर लाल नेहरू विद्यालय (जेएनयू) परिसरात रविवारी (5 जानेवारी) सायंकाळी काही अज्ञात गुंडांनी घूसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. तर, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झालेत. ‘अभाविप’कडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली असून हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.