नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मालमत्तेचे नुकसान, हिंसाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनेची दखल घेतली आहे. सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही माहिती मिळवत आहोत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निषेध नोंदवत आहेत. मुंबई, पुण्यातही हल्ल्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोषदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. दरम्यान, रुग्णालयात दाखल २३ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असून लवकरच गुन्हे दाखल केले जातील असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.