कोरोना ; नव्या रुग्णांच्या तुलनेत आज साडे तीन पट बरे झाले !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज संक्रमित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात १५७  बाधित रूग्ण आढळले तर ५७५  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर चाळीसगाव येथे संसर्ग वाढला आहे.

 

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-२९ , जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-३, अमळनेर-४, चोपडा-२, पाचोरा-६, भडगाव-५, धरणगाव-३, यावल-५, एरंडोल-३, जामनेर-९ , रावेर-३, पारोळा-४, चाळीसगाव-६०, मुक्ताईनगर-०, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील १  असे एकुण १५७  बाधित रूग्ण आढळले आहे.

 

आजच्या अहवालानुसार आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ४०  हजार १४२  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३२  हजार ४४९  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५ हजार १५८  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत असून आज ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Protected Content