चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील धामणगाव येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात आज दि. 31 ऑगस्ट रोजी शिक्षक पालक सभा घेण्यात आली. या सभेत युवानेते मंगेश चव्हाण यांनी विशेष उपस्थिती दिली. यावेळी ते बोलत होत की, विद्यार्थी जीवनात शिक्षण महत्वाचे आहे. मी मत मिळवण्यासाठी नव्हे, तर माणसांची मन जिंकण्यासाठी काम करत असतो.
सर्वोदय माध्यमिक विद्यालय, शाखा धामणगाव येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी उपयोग व्हावा, म्हणून अद्यायावत प्रोजेक्टर भेट दिले. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती चालू करण्याचाही संकल्प व्यक्त केला. शिक्षक पालक सभेसाठी आपल्या पाल्यांसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या पालकांनचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी कार्यक्रमास सर्वोदय शिक्षण प्रसारक को.ऑप.स.लि. उंबरखेडचे संचालक भाऊसाहेब जगताप, नगरसेवक भास्कर पाटील, मा.नगरसेवक प्रभाकर चौधरी, मा.नगरसेवक निलेश राजपूत, मुख्याध्यापक एल.टी.सोनवणे, प्राथमिक जि.प. मुख्याध्यापक नंदलाल साळुंखे, पालक सभा माजी उपाध्यक्ष राजेंद्र निकम, ग्रामपंचायत सदस्य मनोहर निकम, पालक शिक्षक समिती जिल्हा परिषद शाळा अध्यक्ष सुनिल पवार, पालक-शिक्षक सभा उपाध्यक्ष दिपक निकम, जगदीश निकम, नानासाहेब निकम, मनोज गोसावी आदी उपस्थित होते.