यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला वेग आला असून आपल्या उमेदवारास विजयी करण्यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे शर्यतीचे प्रयत्न करीत असुन, यावल येथे भाजपा प्रचार संपर्क कार्यालयास गुजरातचे आ. जितेशभाई सेवक यांनी भेट देवून प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून रावेर व यावलच्या प्रत्येक बुथचा निवडणुकी संदर्भातील आढावा घेतला व कार्यकर्त्यांना मतदार हा बुथ पर्यंत पहोचण्याबाबतच्या सुचना दिल्यात.
रावेर यावल विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रिपाइं आठवले गट या घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या यावल येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रचार संपर्क कार्यालयास आमदार जितेशभाई सेवक नुरावाडा, विधानसभा क्षेत्र गुजरात यांनी भेट देवुन निवडणुक संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करीत संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला.

याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष राहुल बारी, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, आकाश कोळी, खरेदी संघाचे व्हाइस चेअरमन तेजस पाटील, युवा मोर्चा विशाल शिर्के, यावल शहर उपाध्यक्ष मुकेश कोळी, योगेश चौधरी, कोमल इंगळे, बबलु घारू,भैय्या पटेल , पराग सराफ आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


