जिल्हा परिषदेतील लाचखोर वरिष्ठ सहाय्यकास अटक

जळगाव प्रतिनिधी – पत्नीची बालसंगोपनासाठी रजा मंजूर करुन मिळावी यासाठी तक्रारदाराकडून 1500 रुपयांची मागणी करणाऱ्या लाचखोर शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकास ॲन्टी करप्शन ब्यूरो आज रंगेहात पकडले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांची पत्नी शिक्षक असून तक्रारदा यांच्या पत्नीची बालसंगोपन रजा मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक चेतन भिका वानखेडे (वय-42) रा. मोची नगर, गणपती मंदीराजवळ, धरणगाव यांची 1500 रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबी यांच्याकडे तक्रार देवून सविस्तर माहिती दिली. आज एसीबी यांनी सापळा रचून दुपारी संशयित आरोपी चेतन वानखेडे याला लाचेची रोख रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. यावेळी पोलीस अधिक्षक जी.एम.ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, पो.ना.मनोज जोशी, पोकॉ.प्रशांत ठाकुर, पोकॉ. प्रविण पाटील, नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.महेश सोमवंशी यांनी कारवाई केली.

Protected Content