Home Cities यावल जिल्हा नियोजन समितीच्या विशेष सदस्यपदी हिरालाल चौधरी

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष सदस्यपदी हिरालाल चौधरी

nivad samiti
nivad samiti

nivad samiti

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वनोली येथील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा यावल कृउबाचे संचालक हिरालाल चौधरी यांची पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

1984-85 सालापासून भाजपचे कार्यकर्ते होते. 10 वर्षे वनोली गावाचा सरपंचपदाचा कार्यभार सांभाळला. सन 1991 पासून श्री साईबाबा मंदिर देवस्थान वनोली ता.यावल या मंदिराची कामकाज पहात आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे तीन वर्ष जिल्हा सरचिटणीस भाजपाचे जिल्हा उपाध्यक्षपद 3 वर्षे सांभाळले. तसेच दोडे गुजर समाजाचे जिल्ह्याचे संचालक म्हणून कामकाज पाहत आहे. आता विद्यमान यावल कृउबाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खा. रक्षाताई खडसे यांच्या निवडणुकीची प्रचाराची धुरा या मतदारसंघात त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळली. चौधरी यांची नियुक्ती केल्यानंतर सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound