जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील मतीमंद मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी आरोपी सुरेश वसंत चौधरी आणि अशोक भागवत जाधव या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास आणि 500 रूपये दंड ठोठावण्यात आला. या खटल्यात 11 जणांचे साक्ष नोंदविण्यात आली होती.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडीत मुलगी मतीमंद असून 2 डिसेंबर 2013 रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान आरोपी सुरेश वसंत चौधरी आणि अशोक भागवत जाधव दोन्ही रा. पहूर ता. जामनेर यांनी मतीमंदाचा फायदा घेवून तिच्यावर अतिप्रसंग केला. याप्रकरणी पहूर पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी सपोनि जयवंत सातव यांनी या गुन्ह्यासंबंधी तपास काम पुर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणात पीडीत मुलगी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच वैद्यकिय अधिकारी आणि तपासाधिकारी असे एकून 11 साक्षिदारांची साक्ष घेवून दोघा आरोपींना दोषी ठरवत भादवी कलम 354 अ (i) प्रमाणे दोघांना एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी 500 रूपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसाची कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. प्रदीप महाजन यांनी काम पाहिले.