जळगावात जिजामाता विद्यालयात स्वाती ढाके यांचे व्याख्यान (व्हिडीओ)

रण्उण्अण्‍

जळगाव प्रतिनिधी । शहरातील न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लब जळगाव अंतर्गत 7बाय7बाय7 व्याख्यान माला पुष्प 3 रे आज घेण्यात आले. या कार्यक्रमात ‘विचारांची जादू’ या विषयावर रो.स्वाती ढाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. रो.स्वाती ढाके यांनी विद्यार्थ्यांना ‘विचारांची जादू’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, मुलांनी त्यांचे विचार दृष्टीकोन नेहमीच चांगले ठेवले पाहिजे, स्वत:तील वागवूकीतील बदल करुन विचारांनी अंतरंग उजळावे, चांगला विचार योग्य दिशेला घेऊन जात असतो. मुलांनी मा.इंदिरा गांधी, मा.नरेंद्र मोदी, मा.रतनलाल टाटा अशा महान पुरुषांचे विचार आचारणात आणावे. तसेच या थोर लोकांबद्दल ही काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगितल्या. मुलांनी हसत खेळत विचारांची जादू हा विषय समजून घेतला आहे. याप्रसंगी रो.जितेंद्र ढाके, संजय खैरनार, किशोर पाटील, लता इखनकर, आशा पाटील, संगीता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, शैलजा चौधरी, संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खैरनार तर आभार आशा पाटील यांनी मानले.

Protected Content