एरंडोल प्रतिनिधी । गालापुर तालुका येथील भिल्लवस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि. 8 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ साजरा करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण 26 मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या आहेत. जि.प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहिम राबविण्यात येत असून या मोहिममुळे विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी लाभ होईल, असे ते म्हणाले. यावेळी अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भिल, सुभाष भील, सुनील भील, राकेश माळी, सीमा सोनवणे, कालू पवार, नरेश बागुल, शंकर भिल, पालसिंग बारेला, शशिकांत भील, पिंटू पवार, पिंटू भिल, राजू बारेला, सीताराम ठाकरे व सोमा भिल आदी पालकांनी सहकार्य केले आहे.