Home क्राईम झारखंडमध्ये चकमक; तीन नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

झारखंडमध्ये चकमक; तीन नक्षलवादी ठार, एक जवान शहीद


naxal a zarkhand
 

रांची (वृत्तसंस्था) झारखंडमधील बेलभा घाट परिसरात सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले तर एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे.

 

सीआरपीएफच्या ७ बटालियनने बेलभा घाट येथील जंगल परिसरात स्पेशल ऑपरेशन सुरु केले होते. यावेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सीआऱपीएफ जवानांनी चोख उत्तर देत तीन नक्षलवाद्यांना ठार केले आहे. त्यांच्या मृतदेहासोबतच एक एके-४७ रायफल, ३ मॅगजिन्स आणि चार पाइप बॉम्ब इतका शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. चकमकीत सीआऱपीएफचा एक जवान शहीद झाला आहे.

 

मागील काही दिवसांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपाचा ताफा निवडणूक प्रचाराहून परतत असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात दंतेवाडाचे भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला होता, तर चार जवान शहीद झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound