Home क्राईम गळफास घेवून एकाची आत्महत्या

गळफास घेवून एकाची आत्महत्या


death penalty hanging

जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्रीराम कॉलनीतील एका प्रौढाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, गोपाळ सिताराम महाजन वय 52 रा. श्रीराम कॉलनी, जुना आसोदा रोड यांनी 3 मे रोजी मध्यरात्री राहत्या घरात सर्वजण गाढ झोपेत असतांना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी मुलाच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघकीस आला. जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून याबाबत शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound