Home क्राईम उघड्या घरातून सव्वा लाखांचे दागिने लांबविले

उघड्या घरातून सव्वा लाखांचे दागिने लांबविले


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात उघड्या घरातून १ लाख २० हजार १९९ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी ११ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, आनंदपाल बाबुराव बाविस्कर (वय-५३) हे शिवाजीनगर हुडको परिसरात पंचशील बिल्डींगमध्ये एकटेच राहतात. त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे भाऊ यादवराव बाविस्कर यांच्या पत्नीचे दागिने आनंदपाल बाविस्कर यांच्याकडे ठेवण्यास दिले होते. गुरूवारी ११ जुलै रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा पुतण्या घरात झोपलेला असल्याने आनंदपाल हे दरवाजा न लावता कुत्र्याला फिरवण्यासाठी गेले. त्या दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून पेटीचा कडीकोयंडा, कुलूप तोडून त्यातील सोन्याची अंगठी, सोनसाखळी, बाळी, पोत असे एकूण १ लाख २० हजार १९९ रुपयांचे दागिने चोरून नेले. सकाळी ६ वाजता आनंदपाल हे घरी आले त्या वेळी त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त व पेटीचे कुलूप, कडीकोयंडा तुटलेला दिसला. चोरी झाल्याची खात्री झाल्याने आनंदपाल बाविस्कर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहेत.


Protected Content

Play sound