धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील माळीवाडा परिसरात राहणाऱ्या वृध्द महिलेच्या घरातून भर दिवसा घरातून ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून दिल्याची घटना रविवारी २ जून रोजी दुपारी ३ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजाबाई पुनमचंद माळी वय-८४, रा. माळीवाडा, धरणगाव या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार २ जून रोजी दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घुसून बाथरूममध्ये ठेवलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यातून रुपये ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर वृद्ध महिलेने रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहे.