जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिजाऊ नगरात एका डॉक्टरचे बंद घर फोडून घरातून २ लाख ६२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. दिप्तांशू भाऊसाहेब पाटील वय २५ रा. जिजाऊ नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. वैद्यकीय सेवा करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून २ लाख ६२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले, ही घटना पहाटे ३ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सायंकाळी ७.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे करीत आहे.