जेजुरी । जेजुरी संस्थानाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण होण्याआधीच आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार sharad pawar यांच्या हस्ते उद्या जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. या आधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांनी आज भल्या पहाटे जेजुरी गडावर जाऊन या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलीस प्रशासनाने त्यांना मज्जाव केल्याने येथे काही काळ तणावाचे वातावरण पसरले. पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून पुतळ्याच्या खालील भागातच ठिय्या मांडला.
दरम्यान, या पुतळ्याचे आपण अनावरण केले असल्याची घोषणा आ. पडळकर यांनी केले. शरद पवार हे भ्रष्ट प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे लोकार्पण होऊ नये अशी इच्छा असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
खालील व्हिडीओजमध्ये पहा जेजुरी गडावर नेमके काय घडले ते….
खालील व्हिडीओत बघा आमदार गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणालेत ते