
जळगाव (प्रतिनिधी) जेसीआय जळगाव व धनाजी नाना चौधरी महाविद्यालयतर्फे पाच दिवसाचे युवा सशक्तीकरण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी नॅशनल प्रशिक्षक व ट्रेनर जेसी सैय्यद अलताफ अली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जेसी सैय्यद अलताफ अली यांनी विद्यार्थ्यांना “संभाषण कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. या पाच दिवसीय कार्यशाळेत १२५ विद्यार्थी उपस्थित होते. त्यात इमोशनल मॅनेजमेंट, गोल सेटींग, प्रसर्नल ग्रुमिंग, लिडरशिप व संभाषण कौशल्य या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. पाच दिवसीय युवा सशक्तीकरण कार्यशाळेत तीन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल गौरविण्यात आले.
कार्यशाळेचा समारोप जेसीआय जळगांवचे अध्यक्ष जेसी प्रतिक शेठ यांनी सर्व ट्रेनरचे व कॉलेजचे आभार मानले व आपले मनोगत व्यक्त केले. त्याव्यतिरिक्त धनाजी नाना चौधरी विद्यालयाचे प्राचार्य श्री.राजेंद्र वाघुळदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना पाच दिवसीय कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी जेसीआय जळगांवचे अध्यक्ष जेसी प्रतिक शेठ, प्राचार्य श्री.राजेंद्र वाघुळदे,ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य श्रीमती रेखा भोळे, राष्ट्रीय प्रशिक्षक जेसी सैय्यद अलताफ अली,प्रकल्प प्रमुख जेसी भाग्यश्री त्रिपाठी, आयपीपी जेसी वरुण जैन, पूर्वअध्यक्ष जेसी आबासाहेबपाटील, पुर्वअध्यक्ष जेसी रफिक शेख, सेक्रेटरी जेसी मोईन अहेमद, डायरेक्टर जेसी प्रियंका भराटे, डायरेक्टर जेसी आनंद नागला, उपाध्यक्ष ट्रेनिंग जेसी जयश्री पाटील व समस्त जेसीआय जळगावचे पदाधिकारी उपस्थित होते.