जळगाव (प्रतिनिधी) येथील जेसीआयच्या वतीने जूनियर जेसी वीकचा प्रथम दिवस अर्थात ‘लर्निंग डे’ नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आर.एन.कुलकर्णी (LIC Advisor) हे होते. तर इरिगेशन जेसीआय जळगाव अध्यक्ष जेसी प्रतिक शेठ, जेसी शरद मोरे, जेसी रफीक शेख, आयपीपी जेसी वरुण जैन, जूनियर जेसी यशोधन पाटील या युथ विंग हस्ते केक कापून कार्याक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक जेसी रफीक शेख यानी संगणक तंत्रज्ञानाबाबत मुलांना मार्गदर्शन केले. तर जेसी भाग्येश त्रिपाठी, जेसी आकाश जैन, जेसी अनुराग गांगुली यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना जेसी भाग्येश त्रिपाठी यांनी मांडली. तर जूनियर जेसी चेयरमन यशोधन पाटील यांनी आभार मानले.