यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा सिम येथील रहिवासी जयवंताबाई चावदस पाटील (वय ८३) यांचे गुरूवारी (दि.२०) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज (दि.२१) सकाळी १०.०० वाजता काढण्यात येवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्या रमण पाटील यांच्या आई तर जिल्हा परिषद सदस्य आर.जी. पाटील यांच्या काकू होत्या.