अमळनेर प्रतिनिधी । अमरावती येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रीय विर राणी झलकारी विरंगणा शौर्य महिला पुरस्कार प्रा. जयश्री दाभाडे-साळुंके यांना प्रदान करण्यात आला.
प्रा. जयश्री दाभाडे-साळुंखे यांना साहित्यीक भालेराव, श्रीकृष्ण बेडसे संपादक पत्रकार, धुळे, अॅड. विलास बाविस्कर, आशाताई बाविस्कर उपाध्यक्ष आणि आयोजक हरिश्चंद्र बाविस्कर यांच्या हस्ते सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. जयश्री साळुंके ह्या सातत्याने आदिवासी समाज, विद्यार्थी व महिला यांच्या साठी कार्य करीत आहेत. विविध आंदोलनांच्या माध्यमातून जिथे अन्याय तेथे न्याय मिळवून देण्यासाठी अनेक लढे त्यांनी दिले आहेत. या अनुषंगाने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामुळे समाजातील सर्व स्तरातून प्रा. साळुंके यांचे अभिनंदन होत आहे.